सुसाट वेगाने धावत असलेल्या कारचा अपघात तिघे जण जखमी

रिसोड : सुसाट वेगाने धावत असलेल्या एका कारचा अपघात होऊन तिघे जण जखमी झाल्याची घटना दिनांक 15 जानेवारी रात्री साडेआठच्या दरम्यान रिसोड सेनगाव मार्गावर शाही धाब्यापासुन काही अंतरावर गजानन चौपाल समोर घडली.या घटनेत कारचा अक्षरचा चुराडा झालेला आहे. कारला बघितल्यानंतर यामधून कोणी वाचले असेल का ? अशी चर्चा स्थानिक स्तरावर होती. याबाबत सविस्तर वृत्त असे की सेनगाव कडून रिसोड कडे स्विफ्ट डिझायर पांढऱ्या रंगाची कार सुसाट वेगाने येत होती. गजानन चौपाल जवळ काही अंतरावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गजानन चौपालला असलेले तार कंपाउंड चे पाच ते सात खांब तोडून कार अक्षरशा भिंतीला भिडली या घटनेची. माहिती चौपाल येथे असलेले नगरसेवक पवनसेठ छित्तरका व त्यांच्या कामावर असलेले प्रताप देशमुख यांना समजताच काही अन्य कामगाराच्या मदतीने कारमधील जखमींना ताबडतोब जवळच असलेल्या ग्रामीण रुग्णालयात भरती केले. यातील चालक हा सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील असल्याचे समजते तर बाकी अन्य जखमी हे जिंतूर तालुक्यातील असल्याचे चर्चेतून कळाले. कपिल गजानन खिल्लारे वय13 वर्ष, सिद्धेश्वर रामेश्वर शेजूळ वय 40 वर्षे, विनोद गौतम वय 35 वर्षे असे कारमधील जखमींची नावे असून तिघांनाही पुढील उपचाराकरिता वाशिम येथे हलविण्यात आले आहे. कार मधून काच फोडून जखमींना काढतात असताना प्रताप देशमुख यांच्या हाताला काही जखम झालेली आहे.

मालेगाव, शिरपूर, रिसोड मार्गे हिंगोली या रस्त्याचे काम रिसोड तालुक्यातील बिबखेडा येथून गजानन चौपाल पर्यंत रखडलेले आहे. कित्येक महिन्यापासून हे काम रखडले असून गजानन चौपालजवळ रस्ता अत्यंत धोकादायक झालेला आहे. जुना रस्ता व नवीन रस्ता याच्या जोड असलेल्या ठिकाणी जीवघेणे खड्डे पडलेले आहे. या ठिकाणी छोट्या-मोठ्या दुर्घटना ही बाब नित्याचीच झालेली आहे. यापूर्वीही अनेक घटना घडून नागरिक जखमी होणे व तसेच वाहनांचे नुकसान होणे ह्या घटना घडलेल्या आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे डोकावून पाहत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रस्त्याचे रखडलेले काम अत्यंत जीवघेणे होत चाललेले आहे तर सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष घालेल का असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

प्रमुख खबरे

hi Hindi
X
error: Content is protected !!
सिर्फ सच टीवी भारत को आवश्यकता है पुरे भारतवर्ष मे स्टेट हेड मंडल ब्यूरो जिला ब्यूरो क्राइम रिपोर्टर तहसील रिपोर्टर विज्ञापन प्रतिनिधि तथा क्षेत्रीय संबाददाताओ की खबरों और विज्ञापन के लिए सम्पर्क करे:- 8764696848,इमेल [email protected]