*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाला सहकार्य करा….ठाणेदार नवलकर*
*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाला सहकार्य करा….ठाणेदार नवलकर*
#कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज#
रिसोड(संतोष पाटील बनकर):-कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नागरिकांनी शासनाने निर्देशित केलेल्या नियमांचे कडेकोट पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन रिसोड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सारंगधर नवलकर यांनी केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्याना व कोरोनाला हलक्यात घेणाऱ्यांना कायदेशीर कारवाई करिता सामोरे जावे लागेल.शहरात किंवा सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्कचा उपयोग करणे बंधनकारक असतांना काही नागरिक बेदीक्तपणे विना मास्कचे फिरतांना आढळतात .सध्या ओमयक्रोन संसर्गाच्या धोक्याचे सावट असतांना विना मास्क फिरणारे महाभाग सामाजिक अस्थिरतेचे कारण ठरू शकतात सामाजिक आरोग्य टिकविण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक सारंगधर नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड पोलीस स्टेशन चे सर्व अधिकारी व कर्मचारी चोख कर्तव्य बजावीत आहेत. पोलिसांचा हेतू हा कायद्याचे योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याचा असतो कोणावरही आकासबुद्धीने किंवा अनावश्यक कारवाई होऊ नये यासाठी नवलकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष सूचित केले आहे.
सूज्ञ नागरिकांनी पोलिसना सहकार्य करून नियमांचे पालन करणे हा सामाजिक आरोग्यासाठी उत्तम पर्याय असल्याचे मत नवलकर यांनी व्यक्त केले.