पत्रकार भवनसाठी जागा उपलब्ध करुन द्या;लोकशाही मराठी पत्रकार संघाची मुख्यधिकाऱ्या कडे मागणी.!

पत्रकार भवनसाठी जागा उपलब्ध करुन द्या;लोकशाही मराठी पत्रकार संघाची मुख्यधिकाऱ्या कडे मागणी.!

पत्रकार भवनाच्या प्रश्नावर लोकशाही मराठी पत्रकार संघ मैदानात..!

देऊळगाव राजा/(प्रतिनिधी):- दि.१८ जाने. रोजी लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील पत्रकारांना हक्काची जागा असावी यासाठी पत्रकार भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या याबाबत मुख्याधिकारी नगरपरिषद देऊळगाव राजा यांना
निवेदन देण्यात आले,सदर निवेदनात म्हटले आहे की देऊळगाव राजा तालुक्यात एकूण अंदाजे ७०,ते ८० पत्रकार आहेत, तालुक्यातील अनेक सामाजिक,राजकीय विषय व वंचित-पीडित जनतेला न्यायहक्क मिळवून देण्यात पत्रकार बांधवांचं मोठं योगदान आहे. मात्र अनेकांची राजकीय कारकीर्द घडवणाऱ्या पत्रकारांना देऊळगाव राजा शहरात हक्काची जागा नाही. पत्रकार भवन जागा उपलब्ध करून देण्या बाबत गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होते परन्तु प्रश्न मार्गी लागत नाही हे.तालुक्यात पत्रकारांच्या समस्या असो की पत्रकार परिषद घ्यायची असो यासाठी बसण्यासाठी हक्काचे ठिकाण पत्रकारांना नाही, गेले अनेक वर्षांपासून पत्रकार भावनांचा प्रश्न प्रलंबीत पडून आहे.लोकप्रतिनिधी पत्रकार भवणासाठी निधी द्यायला तयार असले तरी पत्रकार भवन साठी सध्या स्थिती जागा उपलब्ध नाही.त्यामुळे मुख्याधिकारी अरुण मोकळ यांना निवेदन देऊन सदर प्रश्ना कडे विशेष बाब म्हणून या कडे लक्ष देत देऊळगाव राजा शहरात जिथे नगर पालिका मालकीची जागा असेल ती पत्रकार भवणासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष आदिल पठाण,जि. उपाध्यक्ष प्रवीण काकडे, तालुका अध्यक्ष अमोल हरण,ता.उपाध्यक्षराहुल कासारे,सचिव संजय
बोराटे,दयासिंग बावरे,मुन्ना ठाकूर,संदीप म्हस्के,दत्ता हांडे, गणेश मुंढे,संतोष बनकर,चंद्रभान झिने,विजय जाधव,उद्धव बनसोडे,अमोल दंदाले,राजेंद्र डोईफोडे ,परमेश्वर खांडेभराड ,राजेश कोल्हे,आनंथा शिराळकर,वाडेकर यांच्या सह पत्रकार बांधव उपस्तीत होते.
_______________

*आपण जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी झटतोच परन्तु आता सर्व पत्रकारांनी आपल्या न्याय हक्कासाठी ही एकत्रित येऊन कार्य करण्याची आवश्यकता आहे,तालुक्यात पत्रकारांसाठी पत्रकार परिषद घ्याची असेल किंवा महत्वपूर्ण विषयी बैठकी घ्यायच्या असल्यास पत्रकारांना हक्काची जागा सुद्धा नाही.यासाठी आम्ही याबाबत मागणी करून आमचा लढा सुरू केला आहे,तालुक्यातील सर्व पत्रकारांना आम्ही आवाहन करतो सर्व पत्रकारांनी या प्रश्नावर एकत्रित येऊन त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावे.यामुळे नक्कीच पत्रकार भवनाचा प्रश्न मार्गी लागेल.*

आदील एच पठाण,( जिल्हा उपाध्यक्ष)लो.म.पत्रकार संघ. बुलढाणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

प्रमुख खबरे

hi Hindi
X
error: Content is protected !!
सिर्फ सच टीवी भारत को आवश्यकता है पुरे भारतवर्ष मे स्टेट हेड मंडल ब्यूरो जिला ब्यूरो क्राइम रिपोर्टर तहसील रिपोर्टर विज्ञापन प्रतिनिधि तथा क्षेत्रीय संबाददाताओ की खबरों और विज्ञापन के लिए सम्पर्क करे:- 8764696848,इमेल [email protected]