*शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याच्या निर्णयाचा शासनाने पुनर्विचार करावा*

*शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याच्या निर्णयाचा शासनाने पुनर्विचार करावा*

*शिवसंग्राम संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*

देऊळगांवराजा:
राज्यात गेल्या तीन आठवड्यांपासून कोरोना आणि ओमायक्रॉनची संख्या वाढते आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.मात्र राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्या नगण्य असताना शाळा बंद करणे,विद्यार्थ्यांचे अगोदरच मोठे शैक्षणिक नुकसान झालेलं असताना शाळेला टाळे लावणे योग्य नसल्याचे मत अनेक पाकल व्यक्त करत आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये,यासाठी बंद ठेवण्यात आलेल्या शाळा व महाविद्यालये कोविड नियम व अटींचे पालन करून सुरू ठेवण्याबाबत शासनाने पुनर्विचार करावा.अशी मागणी शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
शिवसंग्राम संघटनेने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, महाराष्ट्रातील जनतेमध्ये कोविड-१९ विषाणूंचा प्रादुर्भा व विशेषतः ओमायक्रॉन प्रकारचा विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नियमावली जाहीर केली आहे.सदर नियमांमध्ये शाळा आणि महाविद्यालय हे १५ फेब्रुवारी 2022 पर्यंत बंद असतील असे स्पष्ट केले आहे.मात्र महाराष्ट्र राज्यात मुंबई-पुणे असे मोठे शहरी भाग वगळता ग्रामीण भागामध्ये अद्यापनओमायक्रॉन या विषाणूचा संसर्ग झालेला नाही.विषाणू संसर्ग झालेला नसताना देखील ग्रामीण भागातील शाळा बंद करणे हे शिक्षणाच्या व विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने चुकीचे ठरू शकेल. असे पालकांचे मत आहे.मागील दीड वर्षापासून कोरोना कारणाने शाळेतील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकल्या गेले आहेत.मागिल दोन वर्ष शिक्षण ऑनलाईनच्या माध्यमातुन झाल्याने विध्यार्थ्यांचे कधीही भरुण न येणारे असे नुकसान झाले आहे.आता शाळा-महाविद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थ्याचे बौद्धीक,शारीरिक व मानसीक खच्चीकरण होत आहे. ऑनलाइन शिक्षणाचा फारसा प्रभाव ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणपद्धतीवर झालेला नाही.
मुळात ग्रामीण भागातील बहुतांश शाळा या चौथी ते पाचवी पर्यंत असून दोन किंवा तीन शिक्षकी आहेत. या शाळेत साधारण पटसंख्या हि तीस ते पन्नास दरम्यान आहे. त्यामुळे नियोजन केल्यास कोरोणा नियमांचे पालन करून या शाळा व्यवस्थितपणे चालवल्या जाऊ शकतील.जोपर्यंत ओमायक्रॉन या विषाणूंचा प्रादुर्भाव ग्रामीण भागा पर्यंत पोहोचत नाही. तोपर्यंत ग्रामीण भागातील शाळा बंद करण्यात येऊ नयेत.अशी जनभावना आहे.आवश्यकतेनुसार व कोरोणा नियमामान्वये शाळेत ५०टक्के किंवा वार निहाय इयत्तानिहाय विद्यार्थी उपस्थिती ठेवण्याबाबत नियोजन करता येईल.शासनाने नियोजनाप्रमाणे १५ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्याचे लसीकरण सुरू केले आहे.त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून व पालकाच्या भावना लक्षात घेऊन केविड-१९ चे सर्व निकष पाळून शाळा व महाविद्यालये चालू ठेवावेत.
शाळा व महाविद्यालये कोविड नियमांचे पालन करत सुरू राहतील असा फेरनिर्णय घ्यावा.अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे,जहीर पठाण,अजमत पठाण आदींनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

प्रमुख खबरे

hi Hindi
X
error: Content is protected !!
सिर्फ सच टीवी भारत को आवश्यकता है पुरे भारतवर्ष मे स्टेट हेड मंडल ब्यूरो जिला ब्यूरो क्राइम रिपोर्टर तहसील रिपोर्टर विज्ञापन प्रतिनिधि तथा क्षेत्रीय संबाददाताओ की खबरों और विज्ञापन के लिए सम्पर्क करे:- 8764696848,इमेल [email protected]