*भरधाव दुचाकीने धडक दिल्याने पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना २३ जानेवारीच्या सायंकाळी चिखली- देऊळगाव राजा रोडवरील उंबरखेड फाट्याजवळ घडली*.
*भरधाव दुचाकीने धडक दिल्याने पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना २३ जानेवारीच्या सायंकाळी चिखली- देऊळगाव राजा रोडवरील उंबरखेड फाट्याजवळ घडली*.
कचरूबा काकडे (७६, सम्राट कॉलनी, देऊळगाव राजा) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कचरूबा हे मेहुणा राजाचे माजी सरपंच होते. सीआरपीएफमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते देऊळगाव राजात वास्तव्यास होते. नेहमीप्रमाणे २३ जानेवारीला संध्याकाळी फिरायला गेले होते.
चिखली रस्त्यावरील उंबरखेड फाट्याजवळ भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जालना येथे हलविण्यात आले. दरम्यान काल, २४ जानेवारी रोजी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.