देऊळगावराज्या येथील झोपरपट्टी रहवाशी घराच्या नोंदी साठी आले रत्यावर* *नगरपालिका व तहसील कार्यालय येथे दिले निवेदन*

देऊलगावराजा नगरीतील समता नगर व विवेकानंद नगर याला लागून असलेली खंडोबा टेकडी कडील झोपरपट्टी वसलेली वस्तीतील लोकांमध्ये काही दिवसा पासून भीतीचे वातावरण तयार झाले आहे,
कारण या ठिकाणी जवळपास 10 वर्षा पासून राहत असलेल्या बहुसंख्य लोकांना नगरपालिकेने त्यांच्या राहत्या जागेच्या नोंद रद्द करण्याच्या नोटीस पाठविल्या आहेत
बऱ्याच दिवसा पासून या जागेचा वाद सुरू आहे, ही जागा कोष्टी समाजाच्या समशान भूमीसाठी होती व तेथे कोष्टी समाजातील जुन्या लोकांच्या काही समाधी आहेत असे कोष्टी समाजाचे अध्यक्ष येलगिरे व त्यांच्या सर्व समाजाचे म्हणणे आहे,
परंतु या जागेवर बऱ्याच वर्षा पासून त्या समाजाच्या कोणत्याही व्यक्तीचा अंत्यविधी कार्यक्रम न झाल्यामुळे व ही सरकारी जागा मोकळी असल्या कारणाने ज्या ज्या लोकांना राहण्यासाठी घरे नाहीत अश्या बहुसंख्य हातावर काम करणाऱ्या गरीब मजूर , दारिद्र रेषेखालील लोकांनी तेथे घरे तयार करून राहण्यास सुरुवात केली व त्यांच्या घराला नगरपालिका यांनी ट्रॅक्स सुद्धा आकारून त्यांना वीजपुरवठा, पाणीपुरवठा उपलब्ध करून दिला,
असे असताना अचानक त्यांना त्यांच्या राहत्या घराच्या नोंदी रद्द करण्याच्या नोटीस का देण्यात आल्या,
आज या लोकांनी जायचे कोठे?हा खूप मोठा गँभीर प्रश्न या गरीब जनतेसमोर उभा आहे
ज्यांची घरे कोष्टी समाजाच्या समशान भूमी च्या हद्दी बाहेर आहेत त्यांना ही नगरपालिकेने का नोटीस दिल्या हा प्रश्न तेथील जनसमुदाय नगरपालिका अधिकारी यांना विचारत आहे,
या समशान भूमीसाठी दुसरी सरकारी जमीन उपलब्ध करून दया, आम्हाला बेघर करू नका अन्यथा आम्ही सर्व आमरण उपोषण करू अश्या प्रकारचे निवेदन त्यांनी आज दिनांक 24 जानेवारी ला नगरपालिका व तहसील कार्यालय येथे बहुसंख्य स्त्री, पुरुष लोकशाही मार्गाने एकत्र येऊन निवेदन दिले ,
त्यात प्रामुख्याने समाज सेवा करणारे आकाश (मन्या) भाई कासारे यांनी आवर्जून सहभाग घेतला
या झोपरपट्टी वस्ती मधून मुख्यद्ल बाई, पाखरे बाई, गया बाई, शबन्म शाह, संगीता भालेराव, अशोक जाधव, अजय जाधव, शाह भाई, आदी सर्वच समाजाचे गोर गरीब लोकांचा समावेश होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

प्रमुख खबरे

hi Hindi
X
error: Content is protected !!
सिर्फ सच टीवी भारत को आवश्यकता है पुरे भारतवर्ष मे स्टेट हेड मंडल ब्यूरो जिला ब्यूरो क्राइम रिपोर्टर तहसील रिपोर्टर विज्ञापन प्रतिनिधि तथा क्षेत्रीय संबाददाताओ की खबरों और विज्ञापन के लिए सम्पर्क करे:- 8764696848,इमेल [email protected]