वाईनला दुकानात परवानगी, मग आम्हाला ही शेतात गांजा लावू द्या*अडचणीत सापडलेल्या उद्विग्न शेतकऱ्याची शासनाकडे मागणीसध्या शासनाने किराणा दुकान वर वाईन दारू विक्री करण्याची परवानगी दिली आहे. यामागे शासनाचा महसूला मध्ये मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे.पण शेतकऱ्यांचा कोणताही विचार न करता शेतकऱ्यांना वेठीस धरून आर्थिक संकटात आणून आत्महत्या करण्या शिवाय कोणताही पर्याय राहत नसल्याने शेतात गांजा लागवडीची परवानगी द्यावी अशी मागणी डोंगरकडा येथील शेतकरी संघटनेचे हिंगोली जिल्हा युवा उपाध्यक्ष पराग अडकिने यांनी एका व्हिडिओ द्वारे शासनाकडे मागणी केली आहे.गेल्या वर्षभरामध्ये हिंगोली जिल्ह्यात गांजा जप्तीची जिल्ह्यात सर्वात मोठी कारवाई म्हणून पोलीसांची पाठ थोपटल्याचे काम होत आहेपण शेतकरी गांजा लागवडीकडे का वळला याला कारण सरकारचं धोरण सरकारची उदासीनता व वेळोवेळी पडणारा दुष्काळ विमा कंपन्यानी शेतकऱ्यांना लुटण्याचे काम औषध व खतात मोठ्या प्रमाणात केलेली वाढ यामुळे शेतकऱ्यांना पारंपारिक पिक घेऊन कोणतेही उत्पन्न होत नाही त्याला शासनाचे धोरण मारक ठरत असल्याने शेतकऱ्यांनी गांजा का लावू नाही हा मोठा प्रश्न आहे. शासन किराणा दुकानावर वाईन दारू ठेवण्याची परवानगी देते तर मग शेतकऱ्यांनाही गांजा लावण्यासाठी अधिकृत परवानगी द्यावी अशी मागणी पराग अडकिने यांनी केली आहे. त्यांनी एक व्हिडिओ मोबाईल द्वारे काढून हि मागणी केलीय. त्यामुळें सद्या हिंगोली जिल्ह्यात हा विषय चर्चेचा बनला आहे.