हिंगोली शहरामध्ये चोरीचे सत्र सुरूच…
( गंगाधर मगर प्रतिनिधी)
चोर्यांचे सत्र काही केल्या थांबत थांबत नाहीये, शहरातील गांधी चौकामध्ये स्टीनारायण सीताराम अग्रवाल यांच्या होलसेल किराणा दुकानांमध्ये रात्री चोरट्यांनी प्रवेश करून दुकानातील साहित्याची नासधूस केली आहे. चोरी करण्यासाठी या चोरट्यांनी रात्रभर जिवाचा आटापिटा केला, पण काहीच हाती आले नसल्याचे संतप्त चोरट्यांनी दुकानातील साहित्याची नासधूस केली आहे. सदरील प्रकारा हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तीन चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून पहाणी केली दरम्यान दुकानदारांनी दिवसभराची आलेली रक्कम घरी नेल्यामुळे चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. सदरील दुकान हे होलसेल किराणा असल्यामुळे त्यांना काहीच न देता आले नाही. छताला बसविलेले पीओपी तोडून चोरटे दुकानात प्रवेश करत असल्याचे स्पष्ट सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये दिसून येत आहे. सध्या या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली नाहि. वाढत्या चोरीच्या सतरामुळे हिंगोली शहरातील व्यापारी व नागरिक चांगलेच भयभीत झाल्याचे दिसून येतात. यापूर्वीसुद्धा चोरट्यांवर आळा घालण्यासाठी व्यापारी संघटनांनी पोलिसांविरोधात आंदोलन केले होते. नंतर पोलीस ऍक्शन मोड वर येत काल एक साखळी चोराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरट्याला बेड्या घातल्या आहेत. या प्रकाराला एक दिवस उलटले ला असताना चोरीची घटना घडल्यामुळे पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्यात चे मोठे आव्हान उभे राहिले आहे.