हिंगोली – कनेरगाव महामार्गावर भीषण अपघात..

(गंगाधर मगर प्रतिनिधी हिंगोली)

हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर कलगाव पाटीजवळ भरधाव ट्रक व आयशर टेम्पोची समोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मध्यरात्री बारा ते एक वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. पवन शंकर गायकवाड (रा. नांदेड), मेहमुदखान (रा. सीपाहियोंका मोहल्ला, नागौर, राजस्थान) अशी दोन मयतांची नांव असून एकाचे नांव समजू शकले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशीम येथून एका आयशर टेम्पो मोसंबी घेऊन नांदेडकडे निघाला होता. सदर टेम्पो हिंगोली ते कनेरगावनाका मार्गावर कलगाव पाटी जवळ आला असतांना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (क्र.आरजे-२१-जीए-५५३२) टेम्पोला धडक दिली. या अपघातात ट्रकमधील दोघेही ठार झाले त्यापैकी चालकाचे नांव महेमुदखान असून अन्य एकाचे नांव समजू शकले नाही. तर टेम्पोमधील पवन गायकवाड याचा मृत्यू झाला. तसेच टेम्पोमधील करण अशोक कदम हा गंभीर जखमी झाला.

अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर बासंबा फाटा व कलगाव फाटा या ठिकाणी अद्यापही कोणत्याच प्रकारच्या उडानपुलाची उभारणी न केल्यामुळे हे दोन्ही फाटे मोठ्या प्रमाणात अपघात स्थळ निर्माण झाले आहेत बासंबा व कलगाव वासियांनी वारंवार या ठिकाणी उड्डाणपूल उभारून वाहतुकीची सुरळीत व्यवस्था करण्याचे मागणी करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने अशा प्रकारचे अपघात घडत आहेत भविष्यात अशा प्रकारचे अपघात घडून निरपराध लोकांचे प्राण वाचावेत ही अपेक्षा या भागातील प्रवाशी करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

प्रमुख खबरे

hi Hindi
X
error: Content is protected !!
सिर्फ सच टीवी भारत को आवश्यकता है पुरे भारतवर्ष मे स्टेट हेड मंडल ब्यूरो जिला ब्यूरो क्राइम रिपोर्टर तहसील रिपोर्टर विज्ञापन प्रतिनिधि तथा क्षेत्रीय संबाददाताओ की खबरों और विज्ञापन के लिए सम्पर्क करे:- 8764696848,इमेल [email protected]