हिंगोलीच्या पोत्रा गावात महिला रणरागिणींनी मुद्देमालासह दारू विक्रेत्याला केलं जेरबंद..

  • पोलिसांच्या विरोधात संताप व्यक्त करत पकडलेल्या दारूचे रस्त्यावर भरवले प्रदर्शन.

(गंगाधर मगर प्रतिनिधी हिंगोली)

हिंगोलीत महिलांनी अवैध व्यवसाय करणाऱ्या माफियांना मुद्देमालासह जेरबंद केले आहे, हिंगोलीच्या कळमुरी तालुक्यातील बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या पोत्रा गावात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध देशी दारु विक्रीचा व्यवसाय सुरू आहे, या विरोधात वारंवार तक्रारी देऊन देखील पोलीस दखल घेत नसल्याने, आज या गावातील महिलांनी एकत्र येत मोठ धाडस दाखवत सापळा रचून दारूचे बॉक्स पकडले आहेत , मात्र अश्या दारू विक्रेत्यांना बाळापूर पोलिसांचे अभय असल्याचा आरोप करत या महिलांनी देशी दारूच्या बाटल्यांचे रस्त्यावर प्रदर्शन मांडत पोलिसांच्या विरोधात तासभर रास्ता रोको केला आहे, दरम्यानआंदोलन करणाऱ्या महिलांचा संताप पाहून बाळापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत कार्यवाही सुरू केली आहे. गावात होणाऱ्या अवैध दारू विक्री विरोधात यापूर्वीसुद्धा महिला पोलीस पाटील यांच्यासह गावातील इतरही महिलांनी वारंवार तक्रार करून सुद्धा कार्यवाही केली जात नसल्याने या महिलांनी धाडस करून स्वतः च अवैध दारू विक्रेत्यांचे बिंग फुटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

प्रमुख खबरे

hi Hindi
X
error: Content is protected !!
सिर्फ सच टीवी भारत को आवश्यकता है पुरे भारतवर्ष मे स्टेट हेड मंडल ब्यूरो जिला ब्यूरो क्राइम रिपोर्टर तहसील रिपोर्टर विज्ञापन प्रतिनिधि तथा क्षेत्रीय संबाददाताओ की खबरों और विज्ञापन के लिए सम्पर्क करे:- 8764696848,इमेल [email protected]