मुलगी झाली हो! वसमत शहरामध्ये स्त्री जन्माचे अनोखे स्वागत.
अन्.. अख्या कॉलननिने धरला गाण्यावर ठेका.
हिंगोली : मुलगी जन्माला आली म्हणून विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून होणारा छळ, नकोशी म्हणून केला जाणारा तिरस्कार, मुलगी नको म्हणून केल्या जाणाऱ्या गर्भलिंग निदान चाचण्या अशा अनेक घटना आपण नेहमी पाहतो.पण हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत शहरातील साईनगर या कॉलनी मधील नागरिकांनी मुलगी झाली म्हणून एक अनोखा जल्लोष साजरा केलाय. मुलगी झाल्याचा आनंद वडोळे कुटुंबियांन पेक्षाही त्यांच्या कॉलनी मध्ये राहणाऱ्या कुटुंबीयांना झाल्याचं बघायला मिळालं, वडोळे यांची घरी आल्याच्या नंतर तिचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. जमिनीवर विविध फुले पांघरून व चालत असताना त्या दोघी मायलेकीनवर पुष्पवृष्टी करण्यात आली. कॉलनी मधील नागरिक एवढ्यावरच थांबले नाही तर लहाना पासून ते वृद्धापर्यंत असलेल्यांनी गाण्यावर ठेका धरून आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुलगी ही दोन्ही घरांचा उद्धार करत असते. मुलगी जन्माला येऊ द्या,असा संदेश या परिसरातील नागरिकांनी दिला आहे. मला आलेल्या मुलीचे अनोखे स्वागत केल्यामुळे या स्वागताचे वसमत शहरात कौतुक होत आहे.जल्लोषात झालेल्या या स्वागत त्यामुळे अक्षरशा व डोळे कुटुंबीय भारावून गेल्याचे बघायला मिळाले.