हिंगोली नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमणांवर चालवला जेसीबी..
राजु मगर हिंगोली प्रतिनिधी
नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी तीन दिवस पुर्वीच सांगितले होते तरी पण अनेकांनी अतिक्रमण काढले नव्हते त्यामुळे आज सकाळी अकरा वाजल्यापासून नगरपरिषद पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने अतिक्रमण काढण्याचे काम सुरू केले. खुराणा पेट्रोल पंप च्या परिसरातील अतिक्रमणे, भाजीमंडी, मध्ये अनेक नगर परिषदेच्या गाड्यांमध्ये अतिक्रमण केले होते. ते जेसीबीच्या साह्याने तोडण्यात आले. यावेळी उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे, प्रशासकीय अधिकारी श्याम माळवटकर, कार्यालयीन अधीक्षक देविसिंग ठाकूर, स्वच्छता निरीक्षक अभियंता रत्नाकर आडसिरे , अभियंता रवि दरक, अभियंता हिरेमठ, संदिप घुगे, यांच्या सह पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सह नगर परिषद चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ट्रॅक्टर मध्ये अनेक साहित्य जप्त करण्यात आले.