गरीब गरजुंना जमादार जाधव यांच्या कडून मायेची ऊब..
सध्या जिल्ह्यात थंडीची लाट उसळली असुन थंडीने नागरिकांचे हाल बेहाल झाले आहेत. तर थंडीमुळे रुग्ण संखेत वाढ झाली आहे. एकिकडे आलीशान बंगल्यात राहणारे श्रीमंत लोक थंडीपासून बचाव होण्यासाठी रूममध्ये हिटर लावतात तर काही जण हजारो रूपये किमतीचे ब्लँकेट, स्वेटर वापरतात. मात्र झोपडीत राहणारे गरीब, गरजु थंडीमध्ये कुडकुडत असतात.. अशाच प्रकारे थंडीने परेशान वयस्कर नागरीकांवर एका पोलिस जमादाराची नजर पडली आणि त्यांच्या मनाला सदर गोष्ट लागली. मग काय पोलिस जमादार शंकर जाधव यांनी थेट एटिएमवर जाऊन पैशे काढत आपल्या पगारीतुन 25 गरिब, गरजु वयस्कर महिला पुरूषांना थंडी पासुन बचावासाठी ब्लँकेट चे वाटप करून गरीबांना थंडीत मायेची ऊब दिली. सदर वयोवृद्ध नागरिकांनी पोलिस दादांचे आभार मानत अशिर्वाद दिले.