वाई फाट्याजवळ देशी कट्यासह जिवंत काडतुस जप्त.
वसमत तालुक्यातील वाई फाटा येथे आज कुरुंदा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह आरोपीला रंगेहात पकडण्यातपोलिसांना यश आले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर,अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज कुरुंदा पोलिसांनी वाई फाटा येथे ही कारवाई करुन आरोपी रमाशंकर ओमप्रकाश कशब वय वर्षे 28 उत्तर प्रदेश याला ताब्यात घेतले असून त्याच्याजवळील एक गावठी कट्टा व जिवंत काडतुस,मोबाईल,मोटारसायकल असा एकूण 7 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कुरुंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक गोपीनवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.