अवैध रेती वाहतुकीवर व मटका बहाद्दरावर एलसीबी ची कार्यवाही
पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली ने हिंगोली जिल्ह्यात अवैध धंद्यावर कठोर कार्यवाही करण्याची मोहीम हाती घेतलेली असून पोलीस स्टेशन कळमनुरी हद्दीत परिसरातून अवैध वाळूचे ट्रॅक्टर पकडून आरोपी नामे चंद्रकांत निवृत्ती कदम राहणार हिंगणी व ट्रॅक्टर चालक नामे तुकाराम प्रल्हाद वानखेडे राहणार पूर यांच्यावर अवैध रेती वाहतुकीबद्दल कार्यवाही करून पोलीस स्टेशन कळमनुरी येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. तसेच दुसर्या एका कार्यवाही मध्ये पोलीस स्टेशन गोरेगाव हद्दीत कनेरगाव नाका येथे मटका बहाद्दर आरोपी नामे लखन देवानंद शेळके राहणार कनेरगाव यास पकडून त्याचेकडून नदी 5200 व मोबाईल असा 7,200/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन गोरेगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तिसऱ्या कार्यवाही मध्ये पोलीस स्टेशन नर्सी हद्दीमध्ये पुसेगाव पाटी येथे अवैध मटका चालकाविरुद्ध कार्यवाही करून आरोपी नावे अतुल उर्फ मास रमेश जोंधळे राहणार औंढा , व विवेक पांपटवार राहणार औंढा यांना पकडून त्यांच्या जवळून मटक्याचे साहित्य व नगदी 6150 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन नरसी येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर कार्यवाही मुळे हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदरची मोहीम सतत चालू रहाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री एम राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक श्री यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्री शिवसांब घेवारे, पोलीस अमलदार राजू ठाकुर, विठ्ठल काळे, किशोर सावंत, ज्ञानेश्वर सावळे, शंकर ठोंबरे, विशाल घोळवे. आदीनी कारवाईमध्ये परिश्रम घेतले