*प्रहार जनशक्ती पक्षाचे संतोष शिंगणे देऊळगाव मही सेन्ट्रल बँकला घेराव घेत निवेदन*
;*प्रहार जनशक्ती पक्षाचे संतोष शिंगणे देऊळगाव मही सेन्ट्रल बँकला घेराव घेत निवेदन* शेतकऱ्याच्या बचत खात्यातून कर्ज वसुली करणे थांबवा गेल्या दोन वर्षांपासून कोरोनासारखी महामारी आली असून सर्वच उद्योग धंदे बंद पडले आहेत त्यामुळे उदरनिर्वाह करण्यासाठी शेती हा एकच व्यवसाय चालू आहे. ज्यावेळी चांगले पिकले त्यावेळी विकले नाही. आणि आता शेतकऱ्यांच्या मनासारखा भाव सोयाबीन, कापसाला मिळत असल्यामुळे शाखेच्या बचत खात्यामध्ये पीक विमा, शेतकरी सन्मान निधी, खात्यातील बचत रक्कम आपण कर्ज वसूल करत आहात अश्या असंख्य तक्रारी प्रहार जनशक्ती पक्षाकडे प्राप्त आल्या होत्या म्हणून आपणास विनंती करतो की सदरील प्रकार तत्काळ थांबवावा अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष बँक च्या विरोधात आक्रमक पवित्रा घेईल असा इशारा देण्यात आला.यावेळी जिल्हाउपाध्यक्ष संतोष शिंगणे, नंदकिशोर देशमुख, विनोद नागरे आदी शेतकरी उपस्थित होते"