*राजलक्ष्मी स्कूलमध्ये वसंत पंचमीचा उत्सव साजरा*

*राजलक्ष्मी स्कूलमध्ये वसंत पंचमीचा उत्सव साजरा*
दे.राजा- राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था द्वारा संचलित राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मध्ये वसंत पंचमीचा उत्सव विविध स्पर्धा घेऊन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त आणि विद्येची देवता माता सरस्वती जयंतीचे औचित्य साधून शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र मगर यांनी साक्षर जनता भूषण भारता या उक्तीच्या आधारे शिक्षणापासून वंचित राहिल्याने कशी अधोगती होते हे सांगून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच प्राचार्या मनीषा नायडू मॅडम यांनी वसंत पंचमी या भारतीय सणानिमित्त शुभेच्छा देऊन आपले विचार व्यक्त केले.

याप्रसंगी श्रेया सवडतकर या विद्यार्थिनीने केलेली माता सरस्वतीची वेशभूषा आकर्षक ठरली. कार्यक्रमाची सुरुवात कस्तुरी भोसले, श्रद्धा सुरुशे, सुप्रिया शिंदे, श्रुती नागरे, प्राची मैंद, संस्कृती कांबळे, सान्वी मिनासे, समृद्धी सोनवणे या विद्यार्थिनींनी सरस्वती वंदना सादर करून करण्यात आली. तसेच सुजाता चव्हाण, सिद्धी मेहेत्रे, वैशराज बुरकुल, स्नेहल पवार यांच्या मनोगता बरोबरच सोनम सावंत, संजीवनी जगताप, भक्ती डोईफोडे,रिया गीते, समीक्षा देशमुख या चिमुकल्यांनी सुद्धा माता सरस्वती बद्दल माहिती दिली.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या काही लघुनाटिका सादर केल्या. त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये श्रावणी शिंगणे, सलोनी चव्हाण, तन्वी वायाळ, आर्या वरदे, श्रुती दराडे, खुशबू सकला, राज भोसले, सम्राट कसारे, राशी सकला, लब्धी सकला, यांनी लघुनाटिका सादर केल्या तर अर्पिता पटेल, भक्ती डोईफोडे यांनी नृत्य सादर केले.

याप्रसंगी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये फुलदाणी तयार करण्याच्या स्पर्धेत तनिषा खरात, आराध्या पेटकर, उमंग पटेल, तृप्ती उगले हे विद्यार्थी विजयी ठरले तर पुष्पगुच्छ तयार करण्याच्या स्पर्धेत अवधूत वाघ, रिया गीते, सोजस वाघ, मिताली तायडे, माही ताठे, नागवर्षिता छावा विजयी ठरले तसेच फुलांची रांगोळी तयार करण्याच्या स्पर्धेत श्रुती नागरे, समृद्धी जायभाये, समृद्धी सोनवणे, कस्तूरी भोसले, अश्विनी जाधव, श्रावणी राखुंडे, सायली डोईफोडे हे विद्यार्थी विजयी ठरले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभागाच्या सुनिता टेकाळे, सपना पारवे, स्वाती कोस्ट यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या ढोले आणि प्रतिक साळवे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

प्रमुख खबरे

hi Hindi
X
error: Content is protected !!
सिर्फ सच टीवी भारत को आवश्यकता है पुरे भारतवर्ष मे स्टेट हेड मंडल ब्यूरो जिला ब्यूरो क्राइम रिपोर्टर तहसील रिपोर्टर विज्ञापन प्रतिनिधि तथा क्षेत्रीय संबाददाताओ की खबरों और विज्ञापन के लिए सम्पर्क करे:- 8764696848,इमेल [email protected]