राजलक्ष्मी स्कूलची विद्यार्थिनी शलाका खरातचे गौरवशाली यश
राजलक्ष्मी स्कूलची विद्यार्थिनी शलाका खरातचे गौरवशाली यश
दे. राजा- स्थानिक राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी कुमारी शलाका किशोर खरात या विद्यार्थिनींने लिड स्कूलच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या लिड चॅम्पियनशिप परीक्षेत गौरवशाली यश संपादन केले आहे.
लिड स्कूलच्या वतीने इंग्लिश, सायन्स, विषयांमध्ये जूनियर आणि सिनियर अशा दोन गटात ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये सिनियर गटांमध्ये शलाका खरात इंग्लिश चॅम्पियनशिपमध्ये प्रथम आली आहे. या सुयशाबद्दल शाळेच्या अध्यक्षा डॉ. मीनल शेळके, सचिव डॉ. रामप्रसाद शेळके शाळेचे मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र मगर आणि प्राचार्या मनीषा नायडू यांनी शलाका खरात हिचे कौतुक केले आहे तर सिद्धार्थ मोरे व सुनीता टेकाळे यांनी मार्गदर्शनाची यशस्वी भूमिका पार पडली.