ओरडशील तर जिवे मारून टाकेल, चोरट्यांनी वॉचमनला तंबी देत केला हात साफ

 

हिंगोली : हिंगोली ते कळमनुरी मार्गावर उमरा पाटी जवळ गजानन कृषी बाजार या ठिकाणी आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आलेल्या सहा ते सात जणांनी वॉचमनला रॉडचा धाक दाखवून आरडा ओरड केली तर जिवे मारूत अशी धमकी देऊन केबीन मध्ये जाऊन ४० हजार रुपये पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकारानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून चोरट्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.

 

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी मार्गावर उमरा पाटी जवळ हिंगोली येथील हेडा बंधूंचे गजानन कृषी बाजार आहे. याठिकाणी शेतीमालाची खरेदी विक्री केली जाते. दररोज शेकडो क्विंटल धान्याची खरेदी याठिकाणी होते. या ठिकाणी शेतीमालाची विक्री केल्यानंतर लगेचच पैसे देखील दिले जातात. या भागात सुरक्षेसाठी वॉचमन देखील ठेवण्यात आले आहेत.

 

 

दरम्यान, आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दोन वॉचमन जागे होते. यावेळी तेथे सहा ते सात जण हातात लोखंडी रॉड घेऊन आले. त्यापैकी दोघे जण दोन वॉचमन जवळ रॉड घेऊन थांबले कोणी आरडा ओरड केली तर जिवे मारूत अशी धमकी देऊन इतर तिघे जण केबीनमध्ये गेले. त्या ठिकाणी तोडफोड करून तेथे असलेले सुमारे ४० हजार रुपये घेऊन चोरट्यांनी पळ काढला. मात्र पळ काढतांना वॉचमन सोबत झटापट देखील झाली. यावेळी चोरट्यांनी एका वॉचमनचा मोबाईल सोबत नेला.

 

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, कळमनुरीचे निरीक्षक सुनील निकाळजे, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने पोलिसांची पथके रवाना केली आहेत. औढा नागनाथ तालुक्यातील दुर्गम भागात चोरट्यांचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांच्या सुत्रांनी सांगितले….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

प्रमुख खबरे

hi Hindi
X
error: Content is protected !!
सिर्फ सच टीवी भारत को आवश्यकता है पुरे भारतवर्ष मे स्टेट हेड मंडल ब्यूरो जिला ब्यूरो क्राइम रिपोर्टर तहसील रिपोर्टर विज्ञापन प्रतिनिधि तथा क्षेत्रीय संबाददाताओ की खबरों और विज्ञापन के लिए सम्पर्क करे:- 8764696848,इमेल [email protected]