कपड्यांच्या दुकानात काम करणाऱ्याचा मुलगा होणार MBBS
कपड्यांच्या दुकानात काम करणाऱ्याचा मुलगा होणार MBBS
देऊळगाव राजा : शहरातील मागील 25 वर्षापासून कपड्यांच्या दुकानात करणारा काम सखाराम तिडके यांचा मुलगा ओम याने Neet मध्ये चांगले मार्कस मिळवून MBBS ला जाण्याचे स्वतःचे आणि आई वडीलांचे स्वप्न पूर्ण केले. घरामध्ये कोणतेही शैक्षणिक वातावरण नसतांना 10 वी पर्यंत कोणत्याही •विषयाचे ट्युशन नसतांना ओम ने जिंद, परिश्रम, कठोर मेहनत आणि प्रचंड आत्मविश्वास या जोरावर त्याने हे यश संपादन
करून येणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला. त्याच्या या यशाला साथ देण्यासाठी येथील सुप्रसिद्ध कापड व्यापारी तायडे ड्रेसेस चे सर्वेसर्वा राजेश तायडे व माळी कर्मचारी महासंघाचे ता. अध्यक्ष एकनाथ सोनुने सर तसेच महावितरणचे अधिकारी राऊत साहेब, हर्ष तायडे यांनी ओम चा शाल, हार आणि पेढे देऊन सत्कार करून त्याला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी आमचे आई वडील, आजी आजोबा, बहीण उपस्थित होते.