*जुमडा गावातील सावखेड भोई गण मधील युवा सेना विभाग प्रमुख विठोबा पवार यांचे गावातील समस्यासाठी ग्रामपंचायत विरोधात आमरण उपोषण

*जुमडा गावातील सावखेड भोई गण मधील युवा सेना विभाग प्रमुख विठोबा पवार यांचे गावातील समस्यासाठी ग्रामपंचायत विरोधात आमरण उपोषण*

*युवा सेना तालुका प्रमुख शिवाजी कुहिरे पाटील यांच्या मध्यस्थीने आमरण उपोषण सुटले*

*अमोल हरणे देऊळगाव राजा*

देऊळगाव राजा तालुक्यातील ग्रामपंचायत भिवंगाव व जुमडा ही दोन्ही गावे गट ग्रामपंचायत आहे.व तेथील विठोबा पवार हे जुमडा येथील रहिवासी असून शेती करून आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह करतात तसेच ते सामाजिक क्षेत्रात व जन सेवा करण्यास सदैव तयार असतात आणि भिवंगाव व जुमडा ही दोन्ही गावे गट ग्रामपंचायत आहे .जुमडा येथील रस्ता अत्यंत खराब झाला असून त्या रस्त्यावरच जिल्हा परिषद शाळा असुन रहदारी साठी नागरीकांना तसेच शाळेतील मुलांना जाण्यासाठी व येण्यासाठी खूप त्रास होत आहे. तसेच सदर रस्त्याने पाण्याचे व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असुन
मोजे जुमडा येथील सिमेंट रस्त्याचे व नाली बांधकाम हे नितीन कसार यांचे घरापासुन ते कृष्णा शिंदे यांचे घरापर्यंत होणे आवश्यक आहे असे त्यांनी लेखी निवेदन सुद्धा ग्रामपंचायत व पंचायत समिती ला दिले होते परंतु त्यांनी या निवेदनाची दखल घेतली नाही म्हणून 10/02/2022 रोजी त्यांनी आमरण उपोषण मांडले उपोषण मांडताच युवा सेना तालुका प्रमुख शिवाजी कुहिरे यांना माहिती होताच त्यांनी जुमडा या गावी धाव घेतली व भिवंगाव ग्रामपंचायतिचे सचिव व सरपंच यांच्या सोबत आमरण उपोषण विषयी चर्चा करून त्यांचा कडून लेखी घेऊन त्यांना पाणी पाजून उपोषणा ची सांगता केली यावेळी गावातील नागरिक व युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

प्रमुख खबरे

hi Hindi
X
error: Content is protected !!
सिर्फ सच टीवी भारत को आवश्यकता है पुरे भारतवर्ष मे स्टेट हेड मंडल ब्यूरो जिला ब्यूरो क्राइम रिपोर्टर तहसील रिपोर्टर विज्ञापन प्रतिनिधि तथा क्षेत्रीय संबाददाताओ की खबरों और विज्ञापन के लिए सम्पर्क करे:- 8764696848,इमेल [email protected]