कोरोना संसर्गाची च्या बाबतीत चे निर्बंध पाळून कुंभारी येथे गजानन महाराज प्रकट दिन सोहळा उत्साहात संपन्न*
*कोरोना संसर्गाची च्या बाबतीत चे निर्बंध पाळून कुंभारी येथे गजानन महाराज प्रकट दिन सोहळा उत्साहात संपन्न*
*संतोष पाटील बनकर*
*देऊळगाव राजा*
शेगाव नगरीचे प्रती स्वरूप मंदिर असलेले भक्तांचे देवस्थान कुंभारी येथील गजानन महाराजांचे मंदिर आहे दरवर्षी होणाऱ्या महाप्रसाद कार्यक्रमाला मात्र या वर्षी परवानगी नसल्यामुळे मंदिर प्रांगणातच गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की शहरालगत असलेल्या कुंभारी येथे गजानन महाराज मंदिर हे संपूर्ण तालुक्यातील नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील भक्तांचे गणमान्य असे ठिकाण आहे दरवर्षी येथे गजानन महाराज प्रकट दिनी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते त्यानिमित्त तालुक्यातच नव्हे तर दुसऱ्या तालुक्यातून मराठवाडा येथून भाविक प्रसादासाठी येतात परंतु गेल्या दोन वर्षापासून कोरणा संसर्ग निर्बंध ह्यामुळे महाप्रसादाचा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे. तरी ही निर्बंध शिथिल झाल्यानंतर आज सकाळी मंदिर परिसरात श्रींच्या पालखीची मिरवणूक काढून मंदिर प्रदक्षिणा घालण्यात आली .त्यानंतर श्री ची यथोचित पूजा अर्चना करण्यात आले आठवडाभर येथे विविध कीर्तनकारांचे कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये 16 फेब्रुवारी रोजी हरिभक्त परायण ओम महाराज खरात, तर 17 फेब्रुवारी रोजी ह भ प सुरज महाराज कवळे, 18 फेब्रुवारीला ह भ प अनिल महाराज सपाटे, 19 फेब्रुवारीला ह भ प प्रकाश महाराज वाघ ,20 फेब्रुवारीला देविदास महाराज डोईफोडे, 21 फेब्रुवारीला ह भ प परमेश्वर महाराज कवळे, 22 फेब्रुवारीला तेजराव महाराज बुरकुल आज 23 फेब्रुवारीला काल्याचे किर्तन ह भ प श्री संत रामदास निकम गुरुजी यांचे झाले काल्याच्या कीर्तनानंतर दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना लाडूच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. आठवडाभर आयोजित भजन मालिका आणि कीर्तनाच्या कार्यक्रमा अंतर्गत येणाऱ्या भाविकांसाठी कुंभारी देऊळगाव राजा ,नांदखेडा सावखेड भोई देऊळगाव राजा कुंभारी, जवळखेड ,डोईफोडे वाडी ,पांगरी, की मी पवार ,उंबरखेड ,दगडवाडी, गारगुंडी सिनगाव गाव ,पिंपळगाव चिलखा जवळखेड किनी पवार शिराळा येथील भजनी मंडळ यांनी सहभाग घेतला. तर या भजने मंडळींना संजय पगार काशीनाथ गिराम ,मदन घुगे, कांती खांडेभराड, बळीराम खांडेभराड रामदास गीते, दामोदर डोईफोडे, तेजराव महाराज बुरकुल, दगडू खराट डॉक्टर सुनील कायंदे, देवानंद कायंदे तरेश रुपरेलिया आणि भाविकांना अन्नदान केले श्री गजानन महाराज सेवाभावी मंडळ कुंभारी यांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे योग्य नियोजन केले आणि व्यवस्था केली होती या वेळी मंदिर परत परिसरात अतिशय शिस्तबद्ध रित्या दर्शन घेत होते.