*राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे उद्घाटन संपन्न. (चिखली प्रतिनिधी) -:
(मेघा जाधव) एस पी एम तात्यासाहेब महाजन कला व वाणिज्य महाविद्यालय चिखली जिल्हा बुलढाणा चे राष्ट्रीय सेवा योजनेच्या कोलारा ग्राम येथे होत असलेल्या सात दिवसीय निवासी शिबिराचे उद्घाटन दि.22 मार्च 2022 रोजी पर पडले. या प्रसंगी उद्घाटक म्हणून श्री सिध्देश्वर संस्थान चे अध्यक्ष श्री साहेबराव सोलंकी हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शि प्र म अध्यक्ष श्री रामकृष्णदादा शेटे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शि प्र म चे संचालक श्री शंकरराव शेटे, श्री राजाभाऊ खरात ,श्री सुहासजी जामदार तथा प्राचार्य डॉ.सुभाष गव्हाणे, सेनेट तथा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.प्रफुल्ल गवई, क्षत्रिय समन्वयक डॉ नागेश गायकवाड व रामेश्वर सोलंकी हे उपस्थित होते. प्रास्ताविकात रासेयो चे कार्यक्रम अधिकारी डॉ सुभाष राऊत यांनी शिबिरा दरम्यान राबवण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमाची रूपरेषा विषद करून यावर्षी उन्हाळा आसला तरी एखादा चांगला प्रकल्प हाती घेण्याची इच्छा व्यक्त केली. उद्घाटनपर भाषणात शिदेश्वर संस्थानचे अध्यक्ष श्री साहेबराव सोलंकी यांनी,” एस पी एम महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर म्हणजे विद्यार्थ्यावर जीवनाचे खरे संस्कार करण्याचे केंद्र होय” असे म्हटले. त्यानंतर प्राचार्य डॉ सुभाष गव्हाणे,डॉ.प्रफुल्ल गवई,श्री रामेश्वर सोलंकी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी PSI , पदी नियुक्ती झालेला योगेश पवार व पोस्टमन म्हणून निवड झालेला परसने यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात शि प्र म चे अध्यक्ष श्री रामकृष्ण दादा शेटे यांनी “आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी या ठिकाणाहून चांगले संस्कार घेऊन आयुष्यात उंच भरारी घेऊन महाविद्यालयाचे नाव चमकावतील यात मला मुळीच शंका वाटत नाही” असा विश्वास त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.विजय वाकोडे यांनी केले. या कार्यक्रमाला डॉ देशमाने,डॉ बारड ,डॉ माळशिखरे, डॉ गवई, डॉ इंगळे,डॉ मारे,डॉ महाजन श्री संतोष राजपूत आणिग्र